ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने नुकताच एक नवीन कायदा सादर केला आहे. उत्तर कोरियातील परकीय प्रभाव दूर करण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि विशेष भाषा वापरल्याबद्दल फाशीच्या शिक्षेपासून तुरुंगवासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच किम जोंगने कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी विचित्र फर्मान जारी केले आहे. आपल्या देशातील मांजर आणि कबुतरांना मारून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. चीनमधील कोरोना विषाणू मांजर आणि कबुतरांच्या माध्यमातून उत्तर कोरियाच्या सीमेवर प्रवेश करत असल्याचा संशय जोंग उन यांना आहे.