ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगातील कोणतीही देशाच्या सरकारी संस्थेने मंजुरी दिलेली लस भारतात आयात करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परदेशात ज्या लसींना मंजुरी मिळाली आहे, अशा लसींची 7 दिवसांपर्यंत 100 रुग्णांवर टेस्ट केली जाईल. त्यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्या लसींचा समावेश केला जाणार आहे.
यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंजुरी दिलेल्या लसी सुरुवातीच्या टप्प्यात भारतात आयात करण्यात येतील. या लसींची रुग्णांवर चाचणी झाल्यानंतर लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश केला जाईल. तसेच भारतीय औषध निर्माता कंपन्यांना या लसींच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळवता येईल.
भारतात सध्या सीरमची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस वापरण्यात येत होती. सोमवारीच रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसीलाही आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.