ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या 100 देशातील शास्त्रज्ञांचा 4 डिसेंबरचा दौरा रद्द करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीचा आढावा घेणार आहेत. त्याचवेळी 100 देशांचे राजदूतही सिरमला भेट देणार होते. मात्र, मोदींच्या दौऱ्यामुळे हा दौरा 4 डिसेंबरला घेण्याचे ठरले होते. काही कारणास्तव शास्त्रज्ञांचा 4 डिसेंबरचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
सिरम ही लस निर्मिती क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे सिरम भारतात उत्पादन करत आहे.