प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यात महामार्गालगत असणाऱ्या ठक्कर सिटी येथे लक्झरी बसने परप्रांतीयांना चिरडले. या अपघातात एक परप्रांतीय ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उंब्रज येथून मनोजकुमार बहादूर भार्गव (वय 19 रा. मध्यप्रदेश), मुनसिफ खान (रा. मध्यप्रदेश)व त्यांचे दोन-तीन साथीदार ट्रकमधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र काही कारणास्तव ते साताऱ्यातील ठक्कर सिटीलगत असणाऱ्या महामार्गावर उतरले. यावेळी या ट्रकच्या मागून लक्झरी बस (जेए 08 व्ही 5045) ही गोव्याकडून मुंबईकडे निघाली होती. या बसच्या मागील बाजुच्या चाकाचे नटबोल्ट निघाल्याने चाके निसटून लक्झरी बस या परप्रांतीयाच्या दिशेने आली. यातील मनोजकुमार भार्गव यांच्या अंगावरून ही बस गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुनसिफ खान या अपघातात गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या मुनसिफला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.