गोकुळ शिरगाव/ प्रतिनिधी :
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांची गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत मध्ये नोंद करण्यासाठी कामगार वर्गाची सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अकरा वाजल्यापासून संध्याकाळ पर्यंत मोठी लाईन.
देशभरात काम करत असलेले परराज्यातील कामगार लॉक डाऊन मुळे अडकून पडलेले कर्मचारी यांचा केंद्र सरकारने आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. याच धर्तीवर आज गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ शिरगांव ग्रामपंचायत ने सर्व नागरिकांना सकाळी एक आवाहन केल्यानंतर यामध्ये त्यांनी गावातील आपल्या घरातील भाडेकरू जे पर राज्यातील आहेत व संचार बंदी चे काळात अडकलेले असुन ते परत त्यांच्या राज्यात जाण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी आपली नावे ग्रामपंचायत गोकुळ शिरगांव येथे सायं: 4 वाजेपर्यंत कळवावीत.
सोबत: आधार कार्ड घेउन येणे. असे आवाहन केल्यानंतर सकाळपासून परप्रांतीय कामगारांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपली नोंद केली सायंकाळपर्यंत 350 च्या आसपास नाव नोंदणी झाली असून आणखीन लोक येत आहेत .असे यावेळी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत चे क्लार्क सागर मिसाळ यांनी सांगितले.