मच्छीमारांची सीमा शुल्क, तटरक्षक दल, सागरी पोलिसांच्या संयुक्त गस्तीची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्टाच्या हद्दीमध्ये परप्रांतीय गोवा, केरळ, गुजरात ट्रॉलर्सची घुसखोरी सुरु आह़े या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने सीमा शुल्क विभाग, तटरक्षक दल व पोलीस यांच्या गस्ती नौकांची संयुक्त पथकाद्वारे घुसखोरी करणारे ट्रॉलर्स पकडण्याची मागणी स्थानिक मच्छीमाराकडून करण्यात येत आह़े
कोरोनामुळे स्पीड बोटेचा विषय मागे पडल्याने सध्या मत्स्य विभाग महिना 4 लाख 80 हजार मोजून भाडयाच्या नौकेमार्फत गस्त घालत आह़े मात्र या नौकेचा स्पीड परप्रातींय ट्रॉलर्ससमोर कुचकामी असल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े घुसखोरी करणाऱया नौकांची इंजिन क्षमता अधिक आह़े त्यांचा पाठलाग भाडय़ाने घेतलेली गस्ती नौका करु शकत नाह़ी त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी करुन या नौका निघून जातात़ मत्स्य विभागाला मात्र बघत बसावे लागत़े
कोरोनामुळे मच्छीमारांचे आर्थिक घडी विस्कटलेले होत़ी त्यातच मुसळधार पावसामुळे ऑगस्टमध्ये मासेमारी सुरु होवून सुध्दा जेमतेम काही दिवसच मासेमारीला मिळाल़े सप्टेंबरमध्ये मच्छीमारांना समाधानकारक मासळी मिळू लागली आह़े मात्र परप्रातींय नौकांकडून या मासळीची लुटमार सुरु आह़े त्यामुळे मत्स्य विभागाने सीमा शुल्क विभाग अथवा तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक गस्ती नौकांमार्फंत गस्त घालून धूमाकुळ घालणाऱया नौकांवर कारवाई करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आह़े याकडे स्थानिक, मंत्री खासदार आमदारांनी लक्ष घालावे व संबंधित विभागाचे योगदान घ्यावे. जिल्हातील मच्छीमारांच्या हक्काची मासळी लुटणाऱया परप्रातींय ट्रॉलर्सधारकाना धडा शिकवावा अशी मागणी मच्छीमारांकडून केला जात आह़े