ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. यापुर्वी मुंबईचे परमबीर सिंग यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. बिमल अग्रवाल या व्यापाऱयाने 9 लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल , विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जानेवारी-फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडून 9 लाख रुपयांची वसूली केली. अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या भागिदारी गोरेगावमध्ये बीओएचओ रेस्टॉरेंट अँड बार आणि अंधेरीच्या ओशिवारामध्ये बीसीबी रेस्टऑरेंट अँड बार आहे. हा बार चालवण्यासाठी सचिन वाझे आणि दुसऱया आरोपींनी 9 लाख रुपए आणि सॅमसंग कंपनीचा फोल्ड 2 मोबाईल हफ्ता म्हणून घेतला होता.