ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीआयडीने दोन गुन्ह्यात समन्स बजावले आहे. एक समन्स मरीन ड्राईव्ह येथे श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे, त्यासाठी सोमवारी (दि. 29) तर दुसरे ठाण्यातील खंडणी प्रकरणी आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. 30) असे दोन दिवस परमबीर यांना चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
परमबीर सिंह यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असून, त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. यापूर्वी सीआयडीने भीमराव घाडगे यांच्या तक्रारीच्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब नोंदवला होता.
परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे पाच वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर यांच्यासह सहा वेगवेगळे आरोपी आहेत. यामध्ये सचिन वाझेचा समावेश असून, त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे.