प्रतिनिधी / नागठाणे
परमाळे (ता. सातारा) येथे एकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अनिल लक्ष्मण कदम (वय ३८) असे मृत इसमाचे नाव आहे. अनिल कदम यास दारू पिण्याचे व्यसन होते. शनिवारी रात्री जेवण करून तो वडिलांसोबत झोपण्यासाठी गावातील मित्राच्या पोल्ट्री फार्म वर गेला. मात्र, तेथून तो घरी झोपायला जातो सांगून निघून आला. रात्री उशिरा त्याने दारूच्या नशेत गावातील बिराडे नावाच्या शिवारात सर्जेराव राजाराम कदम यांच्या बंद घराच्या बाहेरील लोखंडी जिन्याच्या पायरीला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. याची फिर्याद भाऊ संतोष लक्ष्मण कदम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.