वृत्तसंस्था / पॅरमा
या आठवडय़ाच्या अखेरीस येथे सुरू होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील इमिलिया रोमागेना परमा खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिला असून सेरेनाने त्याचा स्वीकार केला आहे.
इटालियन खुल्या स्पर्धेत बुधवारी सेरेना विल्यम्सला नादिया पोडोरोस्काकडून सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेनंतर ती आता परमा स्पर्धेत खेळणार आहे. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वी सरावाकरिता सेरेनाने हा निर्णय घेतला आहे.