बसस्थानकावर आढळले दोन पॉझिटिव्ह रुग्ण : बेळगावच्या सीमेवर कडक बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या सीमेवर तपासणी वाढविली आहे. खासकरून महाराष्ट्रातून येणाऱया वाहनधारकांचा आरटीपीसीआर अहवाल किंवा दोन लस घेतल्यासंबंधीचे दाखले तपासूनच बेळगावात प्रवेश दिला जात आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस व आरोग्य विभागाच्या तपासणीत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.
बाची, शिनोळी, राकसकोप, बेकिनकेरे, चलवेनहट्टी, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक व सांबरा विमानतळाबाहेरही चेकपोस्ट उभारले आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची तपासणी करण्यासाठी काकती पोलीस स्थानकासमोरही नाका उभारला आहे.
परराज्यांतून बेळगावात प्रवेशासाठी आरटीपीसीआर तपास अहवाल किंवा लसीकरणासंबंधीचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना सीमेवरून परत पाठविण्यात येत आहे.
काही तपास नाक्मयांवर थर्मल स्क्रिनिंग व रॅपिड टेस्टही करण्यात येत आहे. बुधवारी काही तपासनाक्मयांना भेटी देऊन पोलीस उपायुक्तांनी परिस्थितीची पाहणी केली. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या सीमेवर तपासणी वाढविली आहे.