प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकात लॉकडाऊन शिथिल करून परराज्यामधून येणाऱया आणि परराज्यात जाणाऱया नागरिकांना परवानगी देण्यास प्रारंभ करण्यात आले होते. त्यामुळे परराज्यामधून येणाऱया नागरिकांची गर्दी वाढली होती. मात्र परराज्यामधून येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याने परराज्यामधून येणाऱया नागरिकांची गर्दी रविवारपासून ओसरली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची घेषणा करण्यात आल्याने शेकडो नागरिक परराज्यात अडकले होते. तसेच शेकडो परप्रांतिय नागरिक व कामगार बेळगावात अडकले होते. परराज्यात अडकलेले नागरिक स्वगृही येण्यासाठी आणि परप्रातिय नागरिक जाण्यासाठी धडपड करीत होते. पण लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या नागरिकांना ये-जा करण्यास परवानगी मिळाली नाही. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱया टप्यात राज्य शासनाने काही बाबतीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. तसेच परप्रांतियांना स्वगृही पाठविण्यासाठी अर्ज भरून घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे परराज्यात अडकलेल्या नागरिकांना येण्यासाठी परवानगी देण्यास प्रारंभ करण्यात आले. त्यामुळे शेकडो नागरिक येण्यासाठी धडपड करीत होते. परराज्यामधून येणाऱया नागरिकांची नोंद करण्यासाठी सीपीएड मैदानात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात बेळगावात येणाऱया नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात होती. मागील दहा दिवसात सातशेहून आधिक नागरिक परराज्यामधून बेळगावात दाखल झाले आहेत. प्रारंभी पाच राज्यातील नागरिकांना सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्याचा आदेश शासनाने बजावला होता. मात्र परराज्यामधून येणाऱया नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्मयता असल्याने सर्व राज्यातून येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत व ग्रामीण भागातील शाळामध्ये क्वॉरंटाईन करण्याचा आदेश जारी करण्यात आलाआहे. 14 दिवस सरकारी संस्थेत अडकून रहावे लागणार असल्याने काहीनी येण्यास टाळले आहे. सर्व राज्यामधून येणाऱया नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याने परराज्यामधून येणाऱया नागरिकांची गर्दी रविवारपासून ओसरली आहे. त्यामुळे सीपीएड मैदानातील कक्ष ओस पडले आहेत.