स्थानिक खबऱयाच्या मदतीने घेतले ताब्यात
चिपळूण
चिपळूण शहरात भोगाळे येथे परिचारिकेवर बलात्कार करणाऱया संशयिताच्या रविवारी रात्री पोलिसांनी मुसक्या आवळल्य़ा मागील दोन दिवसांपासून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके जंग जंग पछाडत होत़ी दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या महत्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांना या संशयिताचा सुगावा लागल़ा अखेर रविवारी रात्री 2 च्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल़े
या घटनेतील पिडीता व आरोपी हे एकमेकांना यापूर्वी ओळखत नसल्याने आरोपीची ओळखपरेड होणे गरजेचे आह़े पिडीता ही बलात्काराच्या घटनेच्यावेळी जखमी झाल्याने आरोपीची अद्याप ओळख परेड घेण्यात आलेली नाह़ी या कारणामुळे आरोपीचे नाव पोलिसांकडून गोपनिय ठेवण्यात आले आह़े संशयित हा परजिह्यातील असल्याची माहिती समोर येत आह़े दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये संशयिताने आपला गुन्हा कबूल केला आह़े
संशयिताला अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े यावेळी पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल़ी पिडीतेसोबत ओळखपरेड झाल्यानंतर आरोपीची पेलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिल़ी या गुह्याचा तपास सुरू असल्याने आरोपीबाबत अन्य काही माहिती देवू शकत नसल्याचे शहा यांनी सांगितल़े
गुरुवारी घडलेल्या घटनेनुसार शहरातील रुग्णालयात परिचारीकेचे काम करणारी तरुणी सायंकाळी घरातून रुग्णालयात जात होत़ी सायंकाळी 7.30 च्या सुमारास शहरातील भोगाळे येथे लॉकडाऊनमुळे निर्मनुष्य असलेल्या परिस्थितीचा फायदा घेत एका नराधमाने पीडितेला पाठीमागून येऊन पकडले. तसेच ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला अंधारात नेले व त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी विरोध करणाऱया या पीडितेला या नराधमाने दगडाने तसेच हाताने मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. यानंतर हा नराधम तेथून पसार झाला होत़ा
या प्रकाराने संपूर्ण जिल्हा सुन्न झाल़ा तर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात होत़ा चिपळूण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होत़ा भररस्त्यावर अशा प्रकारची घटना घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याची टिका समाजाच्या सर्व स्तरातून करण्यात येत होत़ी यामुळे संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांवर कमालीचा दबाव निर्माण झाल़ा यातूनच पोलिसांची विविध पथके संशयिताच्या मागावर होत़ी अखेर स्थानिकांकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आल़े
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरिक्षक समद बेग, पोलीस नाईक संतोष शिंदे, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, कॉन्स्टेबल प्रमोद कदम, कृष्णा दराडे, पोलीस नाईक आदीती जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक वर्षा शिंदे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत झगडे, मनेर, हेडकॉन्स्टेबल नरेश पेडांमकर, पोलीस नाईक लालजी यादव, कॉन्स्टेबल शिवलकर, नंदकुमार कांबळी, महेंद्र केतकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱयांनी केली.़
जिह्यात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना
गुरुवारी भोगाळे रस्त्यावर घडलेल्या घटनेने जिह्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे बोलले जात होत़े तसेच कामावर एकटय़ा जाणाऱया महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आह़े दरम्यान महिलांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जावू नये पोलिसांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले आह़े