रयत संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी संप मागे घेऊन सेवेवर हजर राहावे, असे आवाहन भारतीय कृषक समाज रयत संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केले आहे.
राज्यातील परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना कृषक समाजानानेसुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. तुमच्याबरोबर आंदोलनात आम्हीसुद्धा सहभागी होण्यास उत्सुक आहोत. तुमच्या आंदोलनाचे गांभिर्य सरकारच्या निदर्शनास आले आहे.
तथापि, देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट अत्यंत तीव्र झाली आहे. लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात औषधे पोहोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे आवश्यक आहे. अशा नैसर्गिक आपत्तीवेळी परिवहन कर्मचाऱयांनी सरकारची व जनतेची कोंडी करणे बरोबर नाही. गतवषी विश्रांती न घेता तुम्ही सेवा बजावली आहे. मात्र, आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुम्ही सेवेत हजर व्हा, असे आवाहन मोदगी यांनी केले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अशा वेळी तुमचे आंदोलन योग्य ठरत नाही. तेव्हा संप मागे घ्या, अशी विनंती मोदगी यांनी केली आहे.