बेळगाव : मागील काही वर्षांपासून परिवहनच्या काही कर्मचाऱयांनी इतरत्र बदली करावी, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आले आहे. परिवहनच्या 195 कर्मचाऱयांची त्यांच्या मागणीनुसार पारदर्शकपणे विविध ठिकाणी बदली करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदत्त हेगडे यांनी दिली.
परिवहनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सोमवारी बदलीचे आदेश देण्यात आले. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, चिकोडी, हुबळी, गदग, हावेरी या पाच जिल्हय़ातील कर्मचाऱयांची बदली करण्यात आली आहे. या नऊ विभागातील अंतर्गत आगारात ही बदली होणार आहे. ज्या आगारात कर्मचाऱयांची कमतरता आहे, अशा ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार बदली केली आहे. काही दिवसांपासून बदली प्रक्रिया रखडली होती.