बेंगळूर/प्रतिनिधी
पगाराच्या मुद्द्यांवरून गेल्या १४ दिवसांपासून संपावर असलेले कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे अनेक कर्मचारी बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून कामावर परतले. मंगळवारी सरन्यायाधीश अभय श्रीनिवास आणि न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, कर्मचार्यांवर संपावर जाण्याची वेळ आली नाही कारण यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होईल.
दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बरेच परिवहन कर्मचारी कामावर परतले आहेत. याआधीही काही कर्मचारी नागरिकांचे होणारे हाल पाहून कामावर परतले होते. त्यांनतर ते सलग सेवा देत आहेत. दरम्यान बऱ्याच कर्मचाऱ्यांना संप केल्याने कामावरून निलंबित आणि बडतर्फ केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी वाहनांची मोडतोड केली आहे. त्यामुळेही कारवाई करण्यात आली आहे.