इंडोनेशियातील खुली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा
जकार्ता/ वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप याचे एकेरीतील आव्हान सिंगापूरच्या येवीने संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीतही भारताचा अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
मंगळवारी या स्पर्धेत झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या लोह किन येवीने भारताच्या परुपल्ली कश्यपचा 21-11, 21-14 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या चोई गेयो आणि किम हो यांनी भारताच्या अर्जुन आणि ध्रुव कपिला यांच्यावर 41 मिनिटांच्या कालावधीत 22-20, 21-13 असा विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला.