पहिल्यांदाच सर्व जिल्हय़ांमध्ये हिंडू शकणार पर्यटक
श्रीनगर विमानतळावरून दररोज विक्रमी उड्डाणे
3 दशकांमध्ये पहिल्यांदाच काश्मीरचे सर्व 10 जिल्हे पर्यटकांसाठी खुले केले जात आहेत. यापूर्वी पर्यटक केवळ श्रीनगर, बडगाम, बारामुल्ला आणि अनंतनाग येथेच जाऊ शकत होते. दहशतवादाचे केंद्र राहिलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही पर्यटकांचा वावर दिसून येणार आहे. कुपवाडाचा तंगधार, बंगस, बांदीपोराचा गुरेज, पुलवामातील शिकारगाह यासारखी पर्यटनस्थळे पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. मेपर्यंत राज्यातील जवळपास सर्व मोठी पर्यटनस्थळे खुली होतील. अनेक अज्ञात आणि संरक्षित क्षेत्रांनाही खुले करण्यात येत आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. गुलमर्गसारख्या हिलस्टेशनमधील 100 टक्के हॉटेल बुक आहेत. श्रीनगरमध्sयही 30-40 टक्के हॉटेल्समध्ये आगाऊ नोंदणी झाली आहे. श्रीनगर विमानतळावरून प्रतिदिन 45 विमानोड्डाणे होत असून यातून पर्यटकांचे प्रमाण स्पष्ट होते. पूर्वी हा आकडा केवळ 10-15 असायचा. पहिल्यांदाच अहमदाबाद, बेंगळूर यासारख्या शहरांमधून थेट सेवा सुरू करण्यात आली आहे.
नवी पर्यटनस्थळे खुली होणार
तंगधार ः हा पर्वतीय भाग कुपवाडा जिल्हय़ात नियंत्रण रेषेवर आहे. तिन्ही बाजूला पाकव्याप्त काश्मीर आहे. किशनगंगा नदी तेथून वाहते.
गुरेज- हे खोरे बांदीपोरा जिल्हय़ात नियंत्रण रेषेवर आहे. खोरे प्राचीन चिनी रेशीम मार्गाचा एक अंतर्गत मार्ग आहे. येथे प्राचीन पुरातत्व स्थळ आहे. या भागाला ट्रेकर्ससाठीचा स्वर्ग म्हटले जाते.
बंगस- कुपवाडा जिल्हय़ातील हे खोरे विशाल पर्वत, नद्या आणि जंगलांनी घेरलेले आहे. हा भाग गुलमर्ग आणि पहलगामपेक्षाही सुंदर आहे.
शिकारगाह- पुलवामा जिल्हय़ातील त्राल भागातील हे ठिकाण वन्यजीवांसाठीही ओळखले जाते. या घनदाट जंगलाला पारंपरिक स्वरुपात महाराजांसाठी पसंतीचे शिकारस्थळ मानले जात होते.
दुधपथरी खोरे- दुधपात्रीचा अर्थ ‘दुधाचे खोरे’ असून येथील गवताच्या विशाल मैदानात वाहणारे पाणी दूरवरुन दूधासारखे दिसत असल्याने हे नाव पडले आहे. प्रत्येक ठिकाणी हिमाच्छादित पर्वत आणि देवदारची जंगले आहेत.
डकसम, अनंतनाग- अनंतनागपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे. गवताच्या मैदानांसह ब्रिंगी नदी याला ठिकाणाला सौंदर्य प्राप्त करून देते.
कर्नाह- प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह कुपवाडामध्ये कर्नाह चहुबाजने पर्वतांनी घेरला गेलेल आहे. हे ठिकाण हेली स्कीइंग, स्नो स्कीइंग, रॉक क्लायम्बिंग आणि अत्यंत साहसी पर्यटनासाठी आदर्श आहे. लोलाब ः पूर्वीच्या काळात याला काश्मीरचे प्रवेशद्वार म्हटले जाते. हे अंडाकृती आकारातील खोरे आहे.