सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे नियोजन : मालवण येथे तालुका समितीची बैठक
प्रतिनिधी / मालवण:
गेली दीड-दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्मयासह जिल्हय़ाची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल, तर पर्यटन उद्योग-व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा पर्यटनाचा मुख्य गाभा असणाऱया मालवण तालुक्मयाच्या पर्यटनाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यासाठी महासंघ काम करत आहे. या कामाला सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांनी येथे केले.
मालवण येथील हॉटेल सायबा येथे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण तालुक्मयाची बैठक झाली. बैठकीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, मंगेश जावकर, शेखर गाड, उदय गावकर, सत्यम पाटील, जगदिश चव्हाण, प्रशांत गावकर, मेघा गावकर, अन्वेषा आचरेकर, पूनम चव्हाण, दीपाली शिंदे, भारती वाघ, विद्या फर्नांडिस, समिध मांजरेकर, गणेश पाडगावकर, महेश मयेकर, दादा वाघ, किसन मांजरेकर, सुरेश बापर्डेकर, दादा वेंगुर्लेकर, मिलिंद परुळेकर, मिथिलेश मिठबावकर, मिलिंद झाड आदी उपस्थित होते.
या बैठकीत पर्यटन उद्योग-व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत महासंघाने ग्रामपंचायतींना जो पर्यटन आराखडा बनविण्यास सांगितला आहे. त्याविषयी ग्रामपंचायतींशी संपर्क साधून पाठपुरावा करण्याचे ठरले. तसेच कोरोनाच्या काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. असे असताना वाढीव वीज बिलांमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. वीजबिल कमी होण्याच्या दृष्टीने वीज वितरणच्या अधिकाऱयांची भेट घ्यावी तसेच लॉकडाऊनमुळे बँकांचे हप्ते भरणे पर्यटन व्यावसायिकांना शक्मय झालेले नाही. कर्जाचे हप्ते भरण्याच्या दृष्टीने बँकांनी संबंधितांकडे तगादा लावल्याने शासन पातळीवर काय करता येईल, याविषयीही चर्चा करण्यात आली. चर्चेत बाबा मोंडकर, अविनाश सामंत, दादा वाघ, शेखर गाड, मेघा गावकर, अन्वेषा आचरेकर, पूनम चव्हाण आदींनी भाग घेतला.
विविध आघाडय़ांच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या
सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तसेच तालुकास्तरावर समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात जिल्हा वाहतूक आघाडी उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा वाहतूक आघाडी संघटक दादा वाघ, ग्रामीण वाहतूक आघाडी उपाध्यक्ष जगदिश चव्हाण, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष उमेश बाणे, मोबाईल विपेता संघटना अध्यक्ष सत्यम पाटील, रिक्षा व्यावसायिक संघटना अध्यक्ष महेश मयेकर, तालुका संघटक किसन मांजरेकर, महिला आघाडी मसुरा विभाग अध्यक्ष पूनम चव्हाण, पेंडूर विभाग अध्यक्षा श्वेता चव्हाण, शहर उपाध्यक्षा विद्या फर्नांडिस, तालुका समन्वयक दीपा शिंदे, शहर सचिव भारती वाघ, शहर समन्वयक फेनी फर्नांडिस, शहर उपसमन्वयक नंदा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.