पर्यटन क्षेत्राचे राज्य सरकारकडे लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना राज्यासह इतर राज्यांमधूनही पर्यटक-भाविक येतात. परंतु अद्याप म्हणावा तसा पर्यटन क्षेत्राचा विकास झालेला नाही. त्यातच कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात तरी बेळगाव जिल्हय़ातील पर्यटनस्थळांसाठी भरीव निधी मंजूर करणार का? याची प्रतीक्षा जिल्हय़ातील नागरिक करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाने पर्यटन विभागाकडे यापूर्वीच सर्वसमावेशक पर्यटन विकासाची योजना सादर केली आहे. जिल्हा प्रशासनाने अहवालात उल्लेख केलेल्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी योग्य ती पाऊले उचलली जातील. अधिकाऱयांशी चर्चा करूनच विकास योजना तयार केली आहे, असे जिल्हाधिकारी व जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. कर्नाटक पर्यटन पंचवार्षिक योजना 2020-25 अंतर्गत सर्वसमावेशक पर्यटन विकास योजना तयार झाली असून पर्यटनस्थळे निवडली गेली आहेत. त्या स्थळांच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
बेळगावसह खानापूर तालुक्मयातील पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. मच्छे येथे स्वातंत्र्य सैनिकांचे एक स्मारक उभारले जाणार आहे. देशासाठी योगदान व बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मारक होणार आहे. या प्रकल्पासाठी 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. खानापूर तालुक्मयातील भीमगड, गुहा, भीमगड अभयारण्य व तेथील वन्यजीवींच्या सुरक्षेसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
गोकाक येथील धबधब्यावर 20 मीटरचा काचेचा पूल उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत भर पडून जादा महसूल जमा होईल, असा अंदाज आहे. तेथून जवळच असलेल्या गोडचिनमल्की धबधब्यावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन रस्ता तयार करणे तसेच इतर कामांचा यामध्ये समावेश आहे. बेळगाव उत्तर मतदार संघात अनुभव मंडपची स्थापना केली जाणार आहे.
यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी निधी
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यल्लम्मा देवस्थान येथे यात्री निवास बांधण्यासाठी 5 कोटी, उगरगोळ ते यल्लम्मा डोंगरपर्यंतचा रस्ता, सौंदत्ती शहरापासून डोंगरापर्यंत रस्त्याच्या शेजारी पथदीप व हायमास्ट बसविण्यासाठी 3 कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. रामदुर्ग तालुक्मयातील शबरीकोळ्ळा मंदिराचा विकास करण्यासाठी व यात्री निवास बांधण्यासाठी 2 कोटी रुपये, गोडची वीरभदेश्वर मंदिराजवळ यात्री निवास बांधण्यासाठी 2 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.
या पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी
- मच्छे येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारक
- भीमगड व अभयारण्य विकास
- गोकाक धबधब्यावर काचेचा पूल
- गोडचिनमल्की धबधब्याचा विकास
- बेळगाव उत्तर मतदार संघात अनुभव मंडप
- यल्लमा देवस्थान येथे यात्री निवास व पथदीपांची सोय