प्रतिनिधी / कोल्हापूर
पर्यटन सप्ताहानिमित्त रेन ऑफ रोडींग असोसिएशनतर्फे फोर बाय फोर' गाडÎांचे
रेन ऑफरोडींग रेसर रॅली’चे सोमवारी आयोजन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरसह सांगली व सातारा जिह्यातील 40 गाडÎा सहभागी झाल्या होत्या. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
मोहिमेची सुरुवात खासदार धैर्यशील माने व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हातकणंगले तहसीलदार कविता ढवळे, धृव मोहिते, प्रमोद पाटील, युवराज साळुंखे, आदित्य बेडेकर, योगेश भारती, वासिम सरकवास आदी उपस्थित होते.
रेन ऑफ रोडींगसाठी कोल्हापूर, सांगली सातारा जिह्यातील सुमारे 40 गाडÎांची नोंदणी झाली होती. सुमारे 12 ते 14 किलोमीटर अंतराची ही रॅली विविध अडचणी पार करीत गेली. मोहिमेचे नियोजन प्रताप माने, आरती जगताप, अमित जगताप, प्रसाद माने, ओम लिगडे यांनी केले.