आमदार खवटे यांचे एसआडीसीला आवाहन
विशेष प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरीत गोवा विधानसभेच्या समोर बेतीच्या डोंगराळ भागात बांधण्यात येणाऱया हायकोर्ट जवळ गेल्या अनेक वर्षांपासून लोक तेथे राहत आहेत. त्यामुळे तो रस्ता बंद करायला आम्ही देणार नाही. दुसरा पर्यायी रस्ता तयार केल्यावरच संरक्षक भिंत बांधून हा रस्ता बंद करावा अन्यथा गोवा साधन सुविधा विकास महामंडळ व सरकारविरोधात पर्वरीतील जनता मुख्य रस्ता अडवून आंदोलन करणार, असा इशारा पर्वरीचे आमदार रोहन खवटे यांनी जीएसआडीसीला दिला.
पर्वरीतील पेन्द द फ्रान्स पंचायत क्षेत्रात बांधण्यात येणाऱया उच्च न्यायालायाच्या नवीन इमारतीचे बांधकाम 2015 पासून सुरु आहे. या बांधकामाच्या कामामुळे या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहणाऱया लोकांचा मुख्य रस्ता बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पर्रीकरांनी हा रस्ता बंद होणार नाही असे आश्वासन दिले होते. या हायकोर्टच्या बाजूला वसाहत असून त्याठिकाणी जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे जर या रस्त्यावर हायकोर्टची भिंत बांधल्यावर या लोकांना पर्यांयी रस्ता नाही. त्यामुळे रुग्णवाहीका, अग्नीशमक दल तसेच ंटंकर सारख्या आत्याआवश्यक गाडय़ा येऊ शकत नाही. त्यामुळे जीएसआडीसीने पर्यायी रस्ता अगोदर तयार करुन नंतर हा रस्ता बंद करावा, असे आमदार खवटे यांनी सागितले. यावेळी या कंत्राटदारांनी आठ दिवसात पर्यायी रस्ता तयार करुन देतो, असे आश्वासन आमदारांना दिले.
गेल्या पाच वर्षापासून या हायकोर्टचे काम सुरु आहे त्यामुळे आता या कोर्टच्या चारही बाजूने संरक्षक भिंती बांधल्या जात आहे. या भिंतीमुळे या ठिकाणी राहणाऱया लोकांचा रस्ता बंद होणार आहे. जीएसआडीने या हायकोर्ट प्रकल्पाचे कुठेलेच सादरीकरण पंचायतील दाखविलेले नाही. आपल्याला हवी तशी मनमानी जीएसआडीसी करत आहे, असे आमदार खवटे यांनी सांगितले.
गेल्या जिल्हा पंचायत निवडणूकीत या भागातील लोकांनी भाजपविरोधात मतदान करुन आमदार खवटे यांच्या समर्थकला निवडून आणल्याने भाजप सुडाचे राजकारण करत आहे पण आम्ही असे करायला देणार नाही. पर्वरीतील जनतेला सर्व साधन सुविधा मिळालया पाहीजे. जर या लोकांना पर्यायी रस्ता मिळत नाही तर आम्ही आदोलन करणार, असे पेन्द द फ्रान्सचे सरपंचानी सांगितले.