लाडक्या बाप्पाची स्वतःच घडवतेय मुर्ती : आई-बाबांकडून मृण्मयीला मिळाली प्रेरणा
प्रतिनिधी /सातारा
गणेशोत्सवाची चाहुल लागताच, प्रत्येक जण बाजारा पेठेत विक्रीस दाखल होणाऱया मुर्त्यां खरेदी करतात, आणि त्या मुर्तीचे पुजन आपल्या घरी करतात. पण सातारची कन्या मृण्मयी जाधव ही प्रतिवर्षी आपण स्वतः गणेशोत्सवा दरम्यान पुजन करण्याऱया बाप्पाची आकर्षक मुर्ती घडविते. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुन अगदी लहान पणापासुनच ती शाडूचा व नैसर्गिक रंगाचा वापर करून ही मुर्ती बनविते.
मृण्मयी चे वडील अनिल जाधव हे देखिल उत्तम कलाकार असुन सध्या ते अभियंता म्हणून सेवा बजावितात. तसेच मृण्मयीची आई सीमा जाधव या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आहेत. मृण्मयीने ही कला त्यांच्या वडीलांपासुनच अवगत केली. पुर्वी त्यांचे वडील गणेशोत्सव जवळ आला की, घरच्या बाप्पाची मुर्ती स्वतःच्या हाताने घडवत, त्यावेळी अगदी लहान असल्यापासुन मृण्मयी ही उत्सुकतेने हे सर्व पहात असे, काही वर्षांनंतर ती स्वतःच मुर्ती बनवु लागली.
गणेशोत्सवाच्या आगमना पुर्वी एक महिना आधी पासुन ती ही मृर्ती घडविण्याच्या तयारीस लागते. प्रतिवर्षी विविध रूपातील गणेश मुर्ती ती साकारते. मृण्मयी ही या मृर्त्यां बनविण्याबरोबरच सर्प मैत्रिण म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. तिचे यासंबंधीचे व्याख्याने ही अनेक ठिकाणी झाली आहेत. जाधव कुटुंबातील सर्वच नागरिक पर्यावरण प्रेमी असल्याने, आपण पर्यावरणाचे प्रदुषण कसे टाळता येईल याकडे अधिक लक्ष देतात.
इतरांच्या मुर्त्यां ही साकारते
मागील काही वर्षापासुन तर ती आपल्या घरातील मुर्ती बरोबरच ज्या नागरीकांना बाजारपेठेत विक्री करण्यात येणाऱया मुर्ती खरेदी करण्यास आर्थिक अडचणी असतात. अशा नागरिकांसाठी ही ती अगदी तन्मयतेने मोफत या मुर्त्या बनवुन देते यंदा तीने आपल्या घरच्या मुर्ती बरोबरच इतरांच्या चार मुर्त्या बनवत आहे.
सर्वांकडूनच कौतुक
मृण्मयी ही सर्व गुणात नुपुन असल्याने आम्हाला तिचा खुप अभिमान आहे. तिला तिच्या वडीलांपासुन ही कला अवगत झाली आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सव जवळ आला की ती या गणेश मुर्ती बनविण्यामध्ये मग्न झालेली असते. तिने साकारलेल्या सुबक मुर्तींचे सर्वांकडूनच कौतुक केले जाते.
सीमा जाधव