दुबईत 25 टन ई-कचऱयाचा होणार पुनर्वापर
संयुक्त अरब अमिरातमध्ये एक 15 वर्षीय मुलगी पर्यावरण रक्षणासाठी मोहीम चालवत आहे. या भारतीय वंशाच्या मुलीने मागील 4 वर्षांमध्ये सुमारे 25 टन इलेक्ट्रॉनिक कचऱयाला रिसायकल करण्यात योगदान दिले आहे. रीवा टूलपुले ही मुलगी ‘ वीकेयर डीएक्सबी’ नावाने मोहीम राबवत आहे.
इंटरनेट अन् समाजमाध्यमांची मदत
पर्यावरण रक्षणाशी जवळून संबंध ठेवणाऱया तिच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाता 15 शाळांचे 60 विद्यार्थी जोडले गेले आहेत. काही वर्षांपूर्वी रिवाचे कुटुंब घर बदलत असताना तिच्या आईने गरज नसलेल्या गोष्टी फेकून देऊया का असे विचारले होते. यावर तिने अनावश्यक सामग्रीही योग्यपद्धतीने हटविण्याची गरज व्यक्त केली होती, परंतु तिला यासंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. याचमुळे रीवाने इंटरने आणि समाजमाध्यमाच्या मदतीने काही माहिती प्राप्त केली.
यातून तिला इलेक्ट्रॉनिक कचरा एक मोठी समस्या असल्याचे त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो हे समजले. रीवाने स्वतःच्या काही मित्रांच्या मदतीने या दिशेने काम करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू एक गट तयार झाला आणि आज रीवा या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे.