ब्रिटनमध्ये नवा पुढाकार, विजेच्या उपकरणांचा वापर 10 वर्षांहून अधिक व्हावा
ब्रिटनमध्ये सध्या ‘राइट टू रिपेयर’ नावाचा नवा कायदा चर्चेचा विषय ठरला आहे. हा कायदा ब्रिटनमध्ये गुरुवारपासून लागू झाला आहे. या नव्या कायद्याच्या अंतर्गत वीज उपकरणे तयार करणाऱया कंपन्यांना नव्या कायद्याच्या अंतर्गत ग्राहकांना सुटे भाग उपलब्ध करावे लागणार आहेत. विजेच्या उपकरणांच्या वापरात 10 वर्षांची वाढ व्हावी आणि यातून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा या कायद्याचा हेतू आहे.
ब्रिटनमध्ये भारताप्रमाणे फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन यासारख्या उपकरणांची दुरुस्ती करविली जात नाही. तेथे उपकरण खराब झाल्यास ते फेकून देतात. यामुळे इलेक्ट्रॉनिक कचऱयाचे प्रमाण वाढले आहे. सरकारने विजेच्या उपकरणांच्या वापराचा कालावधी वाढविण्यासाठी ‘राइट टू रिपेयर’ कायदा लागू केला आहे. पण नव्या नियमांनुसार कंपन्यांकडे सुटे भाग उपलब्ध करविण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कालावधी आहे. नवे नियम लोकांना दीर्घकाळ वापरता येऊ शकणारे तसेच दुरुस्ती योग्य उत्पादन देण्याच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे पर्यावरणतज्ञ लिब्बी पीक यांनी सांगितले आहे.
बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार नव्या नियमांच्या अंतर्गत ब्रिटनचे 22 टक्के लोक स्वतःच्या वॉशिंग मशीनची दुरुस्ती करवू इच्छितात. यात पुरुष 32 टक्के आणि महिला 12 टक्के आहेत. पण 16 टक्के लोकांना डिशवॉशरच्या दुरुस्तीत सर्वाधिक समस्या जाणवते. सर्वेक्षणानुसार दुरस्तीकरता वेळ देण्यास महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक तयार असतात.