प्रतिनिधी/ सातारा
पर्यावरण वाचवा, सायकल चालवा, असा संदेश देत पुण्यावरुन गोव्याला सायकल चालवत निघालेल्या पुण्यातील पेडल पुशर ग्रुपच्या सायकलस्वारांचे स्वागत साताऱयात सातारा सायकल प्रेमी कल्बच्यावतीने स्वागत करण्यात आले. सातारी पद्धतीने कंदी पेढे देवून करण्यात आले. साताऱयाचे स्वागत पाहून पुण्याचे सायकलस्वार भारावले.
कोरोनामुळे लॉकडाऊन अन् लॉकडाऊनमुळे सगळेच बंद झाले होते. त्या काळात फिटनेस हाच महत्वाचा भाग आहे. शरीर तंदूरुस्त ठेवण्यासाठी सायकलींगचा व्यायाम महत्वाचा आहे. आपण आजकाल मार्केटमध्ये भाजी आणायला जातानाही दुचाकी घेवून जातो. चालणे फारच कमी झाले आहे. तसेच लॉकडाऊननंतर सायकलीं मिळत नाहीत, अशी अवस्था बनली आहे. सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत पुण्यातील पेडल पुशर या ग्रपुने पुणे ते गोवा अशी सायकल रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात आज पुण्यातून पहाटे चार वाजता झाली. साताऱयात 12 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सातारा सायकल प्रेमी क्लबचे तुषार भोईटे, दत्ता नवघणे, सचिन नवघणे, तेजस सागावकर यांनी सातारी पद्धतीने केले. या मोहिमेत उंब्रज येथे आणखी दोने तर आंबोली येथे 20 जण सहभागी होणार आहेत. गोव्यात आठ दिवस सायकलवरुन फिरुन सायकल चालवा असा संदेश देणार आहेत. यामध्ये रनर असलेल्या महिला सायकलस्वार प्रिती मस्के, बिबवेवाडी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे.
सेवानिवृत्त सेना अधिकाऱयांकडून स्वागत
सायकल चालवण्याची आवड आणि सायकल राईड करण्याचा ज्यांचा छंद असणारे गप्प बसत नाहीत. साताऱयाचे सेवा निवृत्त सेना अधिकारी दत्ता नवघणे यांनी सायकलवरुन अनेक मोहिमा फत्ते केलेल्या आहेत. त्यांनी या सायकलस्वारांचे स्वागत त्यांच्या गावावरुन सायकलवरुन येवून बॉम्बे रेस्टाँरंट ते खिंडवाडीदरम्यान सायकल त्यांच्यासोबत चालवून केले.