प्रतिनिधी/ म्हापसा
पर्रा येथील श्री गणेश मंडळ वरद सिद्धीविनायक मंदिरात मंगळवार दि. 28 रोजी गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी 8.30 वा. अभिषेक पूजा, पुण्याहवचन, देवता प्रार्थना, अथर्वशीर्ष आवर्तण व गृह पूर्वक अथर्वशीर्ष हवन, रुद्र हवन, 12.15 वा. पाळणा सोहळा बलि पूणर्आहुती तसेच यजमान श्री व सौ. श्रेया संजीव तळकर (कारास्तोवाडा पर्रा) यांच्याहस्ते श्री सत्यनारायण पूजा होईल. दु. 1 वा. आरती, 1.30 वा. महाप्रसाद, दु. 3 वा. यजमान श्री व सौ. स्नेहा साईश साळगावकर यांच्याहस्ते श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 4.30 वा. भजनी कलाकार मोहनदास पोळे, गायक गणेश पार्सेकर, म्हाबळेश्वर च्यारी यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यांना हार्मोनिअमवर निलेश गोवेकर, तबल्यावर निशिकांत कळंगुटकर तर पखवाजवर प्रसाद कळंगुटकर साथसंगत करतील. रात्री 7 वा. ‘स्वर संध्या’ गीतांचा कार्यक्रम होईल. यात गायक धनंजय जोशी (नांदेड), प्राची जठार (गोवा), नम्रता पराडकर (गोवा) निवेदक गोविंद भगत, ऑर्गन-प्रदीप शिलकर, हार्मोनिअम-शेखर नागडे, तबला-विभव खाडोलकर, पखवाज प्रसाद कळंगुटकर, ताळ- योगेश रायकर यांचा सहभाग आहे. रात्री 10 वा. महाआरतीने सोहळय़ाची सांगता होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी समितीचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर व कार्यक्रम पूजेचे यजमान संजीव तळकर यांनी केले आहे.