प्रतिनिधी / म्हापसा
पर्रा येथील 21 दिवशीय गणपतीचे विसर्जन काणका येथील श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिराच्या तळय़ात मोठय़ा उत्साहात करण्यात आला.
पर्रा गणेश मंदिराच्या सभागृहात तत्पूर्वी जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर, पर्राच्या सरपंच डिलायला लोबो आदी मान्यवरांच्याहस्ते सोडत निकास काढण्यात आला. त्यानंतर फळाफुलांची पावणी होऊन श्री विसर्जन मिरवणुकीत सुरुवात झाली. थाटात नाचत गाजत व फुगडी घालून मिरवणूक सोनारवाडा, परब डेकोरेटर, वैष्णवी टी स्टॉल, लक्ष्मण कोरगावकर घर, पुढे वळसा घालून श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकराच्या तळीत श्रीचे विधीवत थाटात विसर्जन करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी सर्वांचे आभार मानले.