पर्वरी/ प्रतिनिधी
येथील गोवा क्रिकेट अकादमी या मोक्मयाच्या जागेच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहत इमारतींची दैयनीय अवस्था झाली आहे. सद्या त्या इमारतीत कोणीच राहत नाही किंवा त्या दुरुस्तही केल्या जात नाही. पोलीस खात्याने त्या इमारती पूर्ण जमीनदोस्त करून त्याठिकाणी नवीन इमारती उभाराव्यात अशी मागणी पोलिसांकडून वारंवार होत आहे.दोन तीन वर्षामागे त्या दुरुस्त करण्याचा प्रस्ताव खात्याजवळ होता. दोन वेळा पोलीस खात्यातील अधिकाऱयांनी पाहणी करून त्या संबंधीचा अहवाल सरकारला सादरही केला होता. पण नंतर त्या प्रस्तावाचे काय झाले हे समजायला मार्ग नाही.
सदर या इमारती 1984 साली चोगम समीत च्या दरम्यान बांधल्या होत्या .पण या इमारतीच्या सर्व सदनिका खूप छोटय़ा आहेत.एक सदनिका अंदाजे 30 ते 40 चौरस मीटर असून त्यात एक स्वयंपाक खोली आणि हॉल आहे. त्यामुळे तेथे कोणीच राहायला जात नसे.या कारणाने त्या इमारतीतील सदनिका तशाच पडून राहिल्या.कालांतराने त्या मोडकळीस आल्या. आज त्या इमारतींची दारे खिडक्मया मोडलेल्या आहेत.या इमारतीमुळे आजूबाजूचा परिसर खूपच गलिच्छ झाला आहे.त्यामुळे त्या परिसराला ओंगळ स्वरूप आले आहे. काही लोक रात्रीच्या या इमारतीचा गैरवापर करताना दिसत आहे. तेथे अनेक प्रकारचे अनैतिक व्यवहार चालत असतील असा संशय ग्रामस्थाकडून व्यक्त केला जात आहे.
आज पर्वरी परिसर झपाटय़ाने शहरीकरणाकडे झुकत असताना अशा मध्यवर्ती ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारती शहराची शोभा घालवित आहे.तसेच या इमारती तातडीने दुरुस्त करून जे पोलीस कर्मचारी सदनिकेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना त्या द्याव्यात. किमान त्यांचा निवासाचा प्रश्न सुटेल आणि त्यांचा वेळ व पैसे वाचतील.असे असे काही पोलिसानी मत व्यक्त केले आहे.
सरकारने पोलीस खात्याच्या या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन त्या इमारती मोडून त्या जागेवर नवीन इमारती उभाराव्यात अशी मागणी पोलिसाकडून होत आहे.