उपाध्यक्षपदी साळगावचे आमदार केदार नाईक, बक्षिसे जाहीर
प्रतिनिधी/ पणजी
पर्वरी मतदारसंघात प्रथमच होणाऱ्या शिमगोत्सव उत्सवामुळे पेन्ह द फ्रान्स, सुकूर व साल्वादोर द मुंद या पंचायत क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. पर्यटन खात्यातर्फे पर्वरी मतदारसंघालाही शिमगोत्सवात स्थान दिल्याने तिन्ही पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार तथा मंत्री रोहन खंवटे व पर्यटन खात्याचे अभिनंदन केले. पर्वरी शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पर्यटनमंत्री रोहन खंवटे व उपाध्यक्षपदी साळगावचे आमदार केदार नाईक यांची निवड करण्यात आल्याची माहिती शिमगोत्सव समितीचे उपाध्यक्ष संदीप साळगावकर यांनी दिली.
पणजी येथील जीसीसीआयच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला शिमगोत्सव समितीचे खजिनदार अनुज हरमलकर, जिल्हा पंचायत सदस्या कविता नाईक, पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकूर पंचायतीच्या सरपंचा सोनिया पेडणेकर, साल्वादोर द मुंदचे उपसरपंच दत्ताराम रेडकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पेन्ह द फ्रान्सच्या पंचायत सदस्या माटिल्डा मार्टिन्स, फ्रान्सिस डिसोझा, सफर फडते, दीपाली वेर्णेकर, गुपेश नाईक, घनश्याम नाईक, सिद्धेश नाईक, पुष्पराज शिरोडकर, नारायण नाईक, माजी पंचायत सदस्य गाब्रीयल वाझ, आदी उपस्थित होते.
अनुज हरमलकर म्हणाले, पर्वरी येथे यंदा प्रथमच शिमगोत्सव होणार असल्याने रोमटामेळ, चित्ररथ व लोकनृत्य पथके मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सरकारने शिमगोत्सव साजरा करताना घालून दिलेली वेळेची मर्यादा पाळूनच समितीतर्फे शिमगोत्सव साजरा करण्यावर आमचा भर राहील. साळगावचे आमदार केदार नाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही पर्वरी शिमगोत्सव समितीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पर्वरीली येथील बगलमार्गावर शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
रोहन खंवटे यांचे अभिनंदन
पर्वरीचे आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या पुढाकारामुळे पर्वरीत प्रथमच कार्निव्हल उत्सव साजरा करण्यात आला. आता शिमगोत्सव मिरवणूकही पहिल्यांदाच काढण्यात येत असल्याने पर्वरीतील जनतेमार्फत मंत्री खंवटे व पर्यटन खात्याचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे पर्वरी शिमगोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिमगोत्सवातील बक्षिसे अशी….
चित्ररथ मिरवणुकीत प्रथम विजेत्यास 45 हजार ऊपये, द्वितीय पारितोषिक 30 हजार तर तृतीय क्रमांकास 25 हजार ऊपये देण्यात येईल. रोमटामेळ सादरीकरणास प्रथम बक्षीस म्हणून 35 हजार ऊपये, द्वितीय 20 हजार ऊपये तर तृतीय क्रमांकास 15 हजार ऊपये देण्यात येणार आहेत. लोकनृत्य पथकासाठी प्रथम बक्षीस 15 हजार ऊपये, द्वितीय विजेत्यास 17 हजार तर तृतीय क्रमांकास 12 हजार 500 ऊपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
वैयक्तिक स्पर्धेतील वेशभूषा वरिष्ठ गटासाठी 4 हजार ऊपये (प्रथम), 3 हजार ऊपये (द्वितीय), 2 हजार ऊपये (तृतीय) देण्यात येणार आहे. कनिष्ठ गटासाठी 2 हजार ऊपये (प्रथम), 1 हजार ऊपये (द्वितीय), 500 हजार ऊपये (तृतीय).