नेपाळी खलाशी नसल्याने गुजरात, रायगडला पसंती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पर्ससीननेट मच्छीमारी हंगामाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. जिह्यात सुमारे 266 पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका असून 1 सप्टेंबरचा मुहुर्त साधण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरु झाली आह़े कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नेपाळी खलाशी उपलब्ध न झाल्याने यावेळी बहुतांश नौकामालकांनी गुजरात व रायगड, ठाण्यातील खलाशांची मदत घेतली आहे.
पर्ससीन नौकेवर प्रत्येकी 25 ते 30 खलाशांची गरज असत़े या कामात स्थानिक खलाशांचे प्रमाण नगण्य असून नेपाळी खलाशांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नेपाळी खलाशांचा मार्ग अवघड बनला आहे. त्यामुळे नौकां मालकांनी ठाणे, रायगड, गुजरात येथील खलाशांना पसंती दिली आहे. रविवारी खसगी बसेसमार्फत सुमारे 350-400 खलाशी मिरकरवाडा बंदरात दाखल झाले आहेत़ त्यामुळे हा परिसर दिर्घ कालावधीनंतर पुन्हा गजबजल्याचे चित्र होते.
1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पर्ससीन मच्छीमारांसाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. शासनाच्या या आदेशानुसार मंगळवारी 1 सप्टेंबरपासून पर्ससीननेट मच्छीमारीला सुरुवात होत आह़े 1 ऑगस्ट पासून गिलनेट, ट्रालिंग व पारंपरीक मच्छीमारी चालू झाल़ी त्यानुसार मिरकरवाडा जेटीवर माल उतरवण्यासाठी तसेच डिझेल, पाणी भरण्यासाठी जेटीवर अनाधिकृतपणे चढवून ठेवण्यात आलेल्या पर्ससीननेट नौकांमुळे अडचणी येत होत्य़ा मात्र याकडे मच्छीमारांनी तक्रार करुनही मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आह़े मात्र आता पर्ससीननेट हंगाम सुरु झाल्यावर या अडचणी दुर होणार आहेत़
अलगीकरण, वैद्यकीय तपासणी धाब्यावर
बाहेरुन येणाऱया कोणत्याही व्यक्तीला कोवीड नियमावलीनुसार वैद्यकीय तपासणी तसेच अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र रविवारी 7-8 खासगी बसमधून बंदरात दाखल झालेल्या या परप्रातीय खलाशांना हा नियम लागू नाही का? असा सवाल उपस्थित होत आह़े मोठय़ा प्रमाणात खलाशी दाखल झाल्यामुळे मिरकरवाडा परीसरामध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आह़े. त्यामुळे कोवीडचा प्रादुर्भाव होण्याची भीती काही मच्छीमारांनी व्यक्त केली आह़े
खलाशांच्या आगमनाबाबत मत्स्य विभाग अनभिज्ञ…
मिरकरवाडा बंदरात खासगी बसेसने जिल्हय़ाबाहेरील खलाशी दाखल झाल्याचीं माहिती नाही. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. असे घडले असल्यास त्यांची मत्स्य विभाग गांभीर्याने दखल घेवून चौकशी करणार आह़े आरोग्य तपासणी व विलगीकरण हे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचे आहे. परप्रांतीय खलाशी मिरकरवाडा बंदरात आलेले निर्देशनास आल्यास त्यांचे शासकीय नियमानुसार अलगीकरण करण्यात येणार आह़े
ना. वि. भादुले सहाय्यक
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त