विधायक कार्यासाठी जगातील अव्वल क्रमांकाचा डीजे डीव्हीएलएम, फेसबुक आणि सनबर्न आले एकत्र : उपक्रमात मिळालेला सर्व निधी ‘मुख्यमंत्री कोविड मदत निधी-गोवा’ला दिला जाणार
पणजी / प्रतिनिधी
अशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स-म्युझिक फेस्टिवल असलेल्या सनबर्न ब्रँड ची कंपनी असलेल्या पर्सेप्ट लाइव्हने गोव्यास पुरस्कृत करण्यासाठी तसेच गोवा राज्यासाठी कोविड मदत निधी संकलन करण्याच्या उद्देशाने सनबर्न फॉर गोवा हा व्हर्चुअल संगीत महोतस्व आयोजित करण्याची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट 2020 रोजी हा महोत्सव लाइव्ह सादर होणार असून यामध्ये जगातील क्रमांक 1चा डीजे डीव्हीएलएम याच्यासह अनेक नामांकित कलाकार संगीतप्रेमींना मुग्ध करणार आहेत. या उपक्रमातून संकलित होणारा सर्व निधी ‘मुख्यमंत्री मदत निधी-गोवा’स दिला जाणार आहे.
कोविड-19 महामारीने साऱया जगास ग्रासले असून त्याचा सर्वच उद्योग क्षेत्रांना मोठा तर पर्यटन उद्योग क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. जगातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गणल्या जाणाऱया गोवा राज्यातील पर्यटन, वाहतूक, हॉटेल, अन्न उत्पादने, विमान सेवा तसेच इतर निगडित लघु व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. 2007 साली गोव्यातूनच सनबर्नला प्रारंभ झाला होता. आजवरच्या प्रवासात जगातील प्रमुख तीन म्युझिक फेस्टिवलमध्ये सनबर्नने स्थान पटकावले असून याद्वारे जागतिक डान्स-म्युझिक क्षेत्राच्या नकाशात गोव्यास ठळक स्थान देण्यात यश मिळवले आहे. गत 13 वर्षांत डिसेंबरमध्ये होणाऱया सनबर्न गोवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी 51हून अधिक देशांतील 20 लाखांपेक्षा अधिक लोक गोव्यात आलेले आहेत.
गत दशकभरातील गोव्याशी जुळलेल्या या संबंधातून या निसर्गरम्य राज्यास आणि कोविड-19 महामारीविरोधात अथकपणे प्रयत्न करत असलेल्या प्रशासनास या स्थितीत काही आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने उद्देशाने या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून पर्सेप्ट लाइव्हने या उपक्रमाची संकल्पना आखली. ‘सनबर्न फॉर गोवा’ या सीएसआर उपक्रमासाठी जगातील अव्वल क्रमांकाचा डीजे डीव्हीएलएम, जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया ब्रँड फेसबुक आणि अशियातील सर्वांत मोठा संगीत महोत्सव असलेला सनबर्न एकत्र आले आहेत. या उपक्रमातून संकलित झालेला सर्व निधी मुख्यमंत्री कोविड मदत निधी-गोवाला दिला जाणार असून त्याचा वापर गोवा राज्यातील कोविड-19विषयक मदतकार्यास केला जाणार आहे.
‘सनबर्न फॉर गोवा’ उपक्रमामध्ये जगातील क्रमांक एकचा डीजे दिमित्री वेगस अँड लाइक माइक यांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. जागतिक स्तरावर ईडीएम क्षेत्रात बेल्जियन डीजे आणि रेकॉर्ड प्रॉडक्शन जोडीने मोहिनी घातली असून त्यांना कँडिस रेडिंग, दीपेश शर्मा, मिस ब्लसि अशा दिग्गज कलाकारांची साथ मिळणार आहे.
जागतिक पातळीवर निधी संकलनासाठी ‘सनबर्न फॉर गोवा’चे 29 ऑगस्ट रोजी जगातील लक्षावधी लोकाना जोडला गेलेला व सर्वांत मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सनबर्नच्या फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण होणार आहे. ‘सनबर्न फॉर गोवा’च्या फेसबुक पेजवर डोनेट बटणच्या माध्यमातून लोकांना या कार्यासाठी थेट मदत करून आपला खारीचा वाटा उचलता येणार आहेच, त्याचबरोबर मनोरंजनाचा सुखद अनुभवही घेता येणार आहे.
याबाबत गोवा राज्याचे पर्यटन मंत्री माननीय श्री. बाबू आजगांवकर म्हणाले, “सनबर्नने एका विधायक उपक्रमाचे आयोजन केले आहे. गोवा आणि सनबर्नवर प्रेम करणारे लोक सढळ हस्ते या उपक्रमास हातभार लावतील. संपूर्ण जगाचे गोव्यात स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.’’
दिमित्री वेगस अँड लाइक माइक म्हणाले, “आमच्यासाठी भारताचे एक विशेष असे स्थान राहिले आहे. येथील रसिक आमच्यावर प्रेम आणि आदराचा नेहमीच वर्षाव करत असतात.’’
पर्सेप्ट लाइव्हचे सीओओ करन सिंह म्हणाले, “सनबर्नला एक जागतिक यशस्वी ब्रँड बनवण्यात गोमंतकीय जनतेचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे या सुंदर प्रदेशाच्या या ऋणाची दखल घेत या संकटकाळी सनबर्न फॉर गोवाच्या माध्यमातून काही तरी परत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया ब्रँड ठरलेला फेसबुक आणि जगातील क्रमांक एकचा कलाकार डीव्हीएलएम यांचे पाठबळ लागल्याने आम्ही भारावून गेलो आहोत. या उपक्रमासाठी रसिकांचे मनोरंजन करण्यसाठी दिग्गज कलाकार व तंत्रज्ञांची मांदियाळी सज्ज झाली असून या उपक्रमातून मिळालेले पाठबळ व निधी या महामारीच्या लढय़ाला मोठा हातभार ठरणार असून जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याला नवी उभारी देण्याचे काम करणार आहे.’’
‘सनबर्न फॉर गोवा’ हा उपक्रम मॅजिक मोमेंट्सद्वारे सादर केला जात असून फास्टट्रक, बोट, जेमसन आणि माउंटन ब्रिझ यांचे सहप्रायोजकत्व लाभलेले आहे. तसेच डब्लू गोवा, हिल्टन गोवा रिसॉर्ट, ग्रँड हयात गोवा, रिवा बिच रिसॉर्ट आणि बॅग डॅडी कॅसिनो यांच्यासह इव्हेंट पार्टनर बुकमायशो आणि गिव्हइंडियाचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.
22 मार्च 2020 पासून चाललेल्या कोविड-19 लॉकडाउनच्या काळात अनेकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेल्या ‘सनबर्न होम फेस्टिवल’, ‘सनबर्न कॅम्पस चॅटबॉक्स’ आणि ‘सनबर्न होम डिजिटल’ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज या उपक्रमांच्या यशानंतर आता सनबर्न फॉर गोवाची घोषणा करण्यात आली. या संकटकाळात आपल्या रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, घरीच राहून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत या महामारीचा मुकाबला करण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सनबर्न लाइव्ह स्ट्रीम उपक्रमांच्या माध्यमातून जगभरातील अनेक दिग्गज डीजे सनबर्नची डिजिटल हँडल्स, ट्विच एप आणि झी5 प्लॅटफॉर्मवर एकत्र आले.
सनबर्न विषयीः पर्सेप्टची मालकी असलेला सनबर्न हा ब्रँड अशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) फेस्टिवल तसेच जगातील प्रमुख म्युझिक फेस्टिवलपैकी एक आहे. 2007मध्ये सुरू झालेला हा 3-दिवसीय सनबर्न म्युझिक फेस्टिवल म्हणजे संगीत, मनोरंजन, उत्सव आणि लाइफस्टाइलचा अनोखा संगम असून गोव्यासह भारतामध्ये संगीत-पर्यटन संकल्पनेचा विकास करण्यात महत्त्वाचा राहिला आहे. गत दशकभराच्या प्रवासात सनबर्नने भारतासह जगभरातील नामांकित कलाकारांना एकत्र आणले आणि विविध संगीत प्रकारांच्या माध्यमातून भारतासह अशियातील लाखो संगीतप्रेमींना अनोखा संगीत नजराण्याची अनोखी भेट दिली आहे.