पशुखाद्यात वाढीनुसार शेतकऱयांना दुध दरात वाढ द्यावी
प्रतिनिधी/ फोंडा
गोवा डेअरीतर्फे जीएसटीचे कारण सांगून शेतकऱयांना पुरविण्यात येत असलेल्या पशुखाद्याच्या दरात रू. 4 प्रति किलोने दरवाढ दुध उत्पादकांसाठी बोजा ठरत आहे. गोवा डेअरीने पशुखाद्याच्या दरवाढीचे घेतलेले पाऊल दुध उत्पादकांना मारक ठरणार असल्याच्या कारणाने शेतकऱयांच्या 30 जणांच्या जमावाने एमडी अनिल फडते यांच्यांशी झालेल्या निष्फळ चर्चेनंतर डेअरीच्या गेटसमोर धरणे धरली. यासंबंधी नेमलेल्या अधिकाऱयांशी चर्चा करण्यासाठी बोलवा, तोपर्यत पशुखाद्य दरवाढ स्थगित ठेवा अशी जोरदार मागणी केली.
दुध उत्पादकांची काल शुक्रवारी सकाळी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांच्यांशी झालेल्या चर्चेत सामाधानकारक तोडगा निघू न शकला. प्रशासकाच्या गैरहजेरीत झालेल्या चर्चेत गोवा डेअरीने शेतकऱयांच्या पशुखाद्यात केलेल्या वाढीनुसार शेतकऱयांकडून घेत असलेल्या दुधाला मोबदला म्हणून प्रति लिटर समांतर दरवाढीच्या हिशोबाने वाढवून द्यावा अशी मागणी दुध उत्पादकांनी केली. अन्यथा प्रशासकांनी तात्काळ चर्चेसाठी उपलब्ध व्हावे असा पवित्रा घेतला व डेअरी प्रशासन कार्यालयाच्या गेटसमोर अडून बसले. त्यामुळे मध्यांतरी जेवणासाठी बाहेर पडणारे कर्मचारी चार तास कार्यलयात कोंडून पडले. त्यावेळी पोलिस फौजफाटा बोलाविण्यात आला.
त्यानंतर घडलेल्या नाटयमय घडामोडीनंतर उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांनी हस्तक्षेप करून एमडी यांच्यासमारे दोन प्रस्ताव ठेवले एकतर त्यांना लेखी आश्वासन किंवा गेट अडवून कर्मचाऱयांना रोखून ठेवल्याप्रकरणी लेखी तक्रार. त्यानुसार एमडीने सोयीस्कर प्रस्ताव स्वीकारला. पशुखाद्य दरवाढ सोमवार 20 जाने. पर्यंत स्थगित ठेवण्याचे लेखी आश्<वासन व परिस्थितीवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी त्याचदिवशी सकाळी 11 वा. प्रशासकांशी बैठक या मागणीवर दुध उत्पादकांनी धरणे आंदोलनातून तात्पुरती माघार घेतलेली आहे.
डेअरी कामगार विरूद्ध दुध उत्पादक
दरम्यान शेतकऱयाच्या आंदोलन मोडीत काढण्यासाठी डेअरी प्लांटच्या कामगारांनी अयशस्वी प्रयत्नही केला. डेअरी प्लांटचे काही कामगार जबरदस्तीने प्रशासक कार्यालयाच्या गेटमधून आत शिरले व त्यानंतर जमावाने बाहेर येण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यावेळी काही कामगारांनी लाथा मारल्यांचा आरोप शेतकऱयांनी केला. जमाव हाताळण्यासाठी पोलिस, मामलेदार, उपजिल्हाधिकारी घटनास्थळी हजर झाले. उपजिल्हाधिकाऱयांनी शेतकऱयांना अटक करण्यासंबंधी एमडीला तक्रार देण्याचे आदेश दिले त्यानुसार पुढील कारवाई पोलिस करणार असा इशारा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले व एमडीच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती माघार घेण्यात आली.
काल गोवा डेअरी परीसरात झालेली परिस्थिती पाहता मूळ मुद्दा दुसरीकडेच राहिला. पशुखाद्य दरवाढीवर चर्चा करण्यासाठी नेमलेला अधिकारी उपस्थित नाही. मात्र थरारनाटय़ घडले शेतकरी व गोवा डअरीचे कर्मचारी. पशुखाद्याच्या 50 किलोच्या पिशवीवर रू. 200 ने वाढ झालेली आहे. पशुखाद्य प्रकल्प ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर चालविण्याचा प्रशासकाचे धोरण आहे तर ग्राहकांना दुधात दरात वाढ का? शेतकऱयांना पशुखाद्यात दरवाढ का ? केवळ कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोगाचे चोचले पुरविण्यासाठी हा खटाटोप का असा सवालही काही शेतकरी करीत होते.