प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात पशुपालन व्यवसाय झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांना स्वावलंबी आणि प्रगतशील करण्यासाठी पशु किसान पेडिट कार्ड योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत भूमीहीन पशुपालकांना सवलतीच्या दरात कर्जाचे वाटप केले जाणार आहे. याकरिता संबंधितांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे अनेक पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. दूध उत्पादनात घट झाल्याने अर्थकारण कोलमडले आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. दैनंदिन जनावरांचे खाद्य, वीज, पाणी, मजुरी आणि पशुपालनासाठी लागणारा किरकोळ खर्च या पेडिट कार्डद्वारे मिळणाऱया कर्जातून भागविता येणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता पशुधनाबरोबर शेळय़ा-मेंढय़ा, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनासाठी पीक कर्जाप्रमाणे कर्ज उपलब्ध होणार असून कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजार इतकी असणार आहे. संबंधित पशुपालकांनी आधारकार्ड, दोन छायाचित्रे आणि शिफारस पत्र देणे आवश्यक आहे. पशुपालकांची आर्थिक बाजू मजबूत व्हावी, पशुधन वाढावे, यासाठी किसान पेडिट कार्ड देण्याचा निर्णयदेखील शासनाने घेतला आहे. यामुळे किसान पेडिटचा पशुपालकांना लाभ घेता येणार आहे.