बेळगाव / प्रतिनिधी
पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागातर्फे शनिवारी पशुवैद्यकीय खात्याच्या आवारात राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी गो-मातेचे पूजन करून राष्ट्रीय कृत्रिम रेतन योजनेला सुरुवात झाली. यावेळी गायी व म्हशींना कृत्रिम रेतन भरवून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. या योजनेंतर्गत पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत कृत्रिम रेतन पोहोचणार आहे. यासाठी जिल्हय़ातील विविध गावांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खात्याचे उपनिर्देशक डॉ. अशोक कोळा, बेळगाव पॉलिक्लिनिकचे उपनिर्देशक डॉ. चंद्रशेखर ए. के., तालुका उपनिर्देशक डॉ. देवेंद्र लमाणी यांसह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नुरकर, डॉ. दीपक यलीगार, डॉ. कुडगी, डॉ. संग्रोळी, डॉ. चंद्रशेखर धरणेपगौडर यांसह खात्याचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.