पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, बेळळारी आदी ठिकाणी यंदाच्या पावसाळय़ात महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये पशुपालकांचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तापर्यंत भरपाई पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात पशुसंजीवनी योजना राबवून प्रत्येक पशुपालकांपर्यंत सुविधा पुरविण्यात येत आहेत. याबरोबरच बेळगाव जिल्हय़ातील अथणी तालुक्मयात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांनी पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी असल्याने पशुपालकांपर्यंत सेवा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र खात्यातील रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात नवीन 4 हजार पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून प्रत्येक पशुपालकांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच जिल्हय़ातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्यादृष्टीकोनातून अथणी येथे लवकरच पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रभू चव्हाण यांनी दिली.
राज्यात गो-हत्या आणि गोमांस विक्री करण्यावर लवकरच प्रतिबंधक कायदा करण्यात येणार आहे. गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यात पाहणी करून इतर राज्यापेक्षा कर्नाटकात या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी दिली. यावेळी पशुसंगोपन खात्याच्या आवारात मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पाणी घालण्यात
आले.
याप्रसंगी पशुपालन आणि पशुवैद्यकीय खात्याचे उपनिर्देशक डॉ. अशोक कोळा, तालुका उपनिर्देशक डॉ. श्रीकांत गांवी, डॉ. के. के. लमाणी यांसह पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित
होते.