दोडामार्ग – वार्ताहर-
राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागाची मोबाईल व्हॅन लवकरच दोडामार्ग शहारासाहित संपूर्ण तालुक्यासाहित गावागावातील नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. साधारणतः तीन चार महिन्यांपूर्वीच आलेली ही व्हॅन कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे दोडामार्गात उभी होती. मात्र आता तीचा सर्वांना लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्यात पशुचिकित्सा पथक स्थापन करणे हा मुख्य उद्देश या फिरत्या व्हॅनचा आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रवींद्र दळवी यांनी केले आहे.