5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
पशु संवर्धनाबरोबर समाजातील विविध घटकांचा आर्थिक स्तर उंचवावा, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. खात्यामार्फत 2021-22 साठी मुख्यमंत्री अमृत योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील व सामान्य वर्गातील पशुपालकांना गायी-म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. याकरिता संबंधित पशुपालकांकडून अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे.
पशुधनाबरोबर दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी आणि पशुपालकांचा आर्थिक स्तर सुधारावा, यासाठी खात्यामार्फत ही योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती जमातीतील पशुपालकांना गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी 20,665 तर सामान्य वर्गातील पशुपालकांना 15,500 रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. संबंधित पशुपालकांनी 5 ऑक्टोबरपर्यंत तालुका पशुसहाय्यक निर्देशकांशी संपर्क करून अर्ज द्यावा, असे आवाहन पशुसंगोपन खात्याचे उपनिर्देशक डॉ. अशोक कोळळा् यांनी कळविले आहे.
संबंधित तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी
तालुके | तालुका पशु सहाय्यक अधिकारी | फोन-मो. नंबर |
अथणी | डॉ. एम. एस. हुंडेकर | 08289-251007 मो. 944835513 |
कागवाड | डॉ. एस. के. कद्दू | मो. 9741599273 |
बैलहोंगल | डॉ. विश्वरप्पा कोलार | 08288-295299 मो. 9448346935 |
कित्तुर | डॉ. बी. पी. हिरेमठ | 08288-286234 मो. 9972993509 |
बेळगाव | डॉ. श्रीकांत गांवी | 0831-2427438 मो. 9448116671 |
चिकोडी | डॉ. एस. एम. उप्पार | 08338-272203 मो. 9448859656 |
निपाणी | डॉ. जयकुमार कंकणवाडी | 08338-290556 मो. 9110418330 |
गोकाक | डॉ. मोहन कामत | 08332-226809 मो. 9986280456 |
मुडलगी | डॉ. एम. बी. विभूती | 08334-251388 मो. 9448185607 |
हुक्केरी | डॉ. टी. एच. देसाई | 08333-265063 मो. 9448564126 |
खानापूर | डॉ. ए. एस. कुडगी | 08336-222488 मो. 8073028448 |
रायबाग | डॉ. रामा राठोड | 08331-225530 मो. 9449661871 |
रामदुर्ग | डॉ. गिरीश पाटील | 08335-242117 मो. 9945854277 |
सौंदत्ती | डॉ. प्रमोद मुडलगी | 08337-254294 मो. 9448823080 |