प्रतिनिधी/ बेळगाव
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पशु संगोपन खात्यातर्फे पुढाकार घेतला असून शुक्रवारी खात्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध जातीची 2 हजार हून रोपे लावण्यात आली. जिल्हय़ातील सर्व पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या आवारात ही लागवड करण्यात आली आहे. पशुपालन व पशुसेवा खाते बेळगाव यांच्यावतीने जिल्हय़ातील पशु वैद्यकीय दवाखान्यांकडे ही रोपे सुपूर्द करण्यात आली होती.
सौंदयीकरण व विकासाच्या नावाखाली दरवषी मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास होऊन प्रदुषणात वाढ होत आहे. रोपांची व झाडांची संख्या वाढविण्यासाठी वनखाते, फलोत्पादन खाते विशेष प्रयत्न करत आहे. त्याबरोबर आता हिरवाई वाढविण्यासाठी पशु संगोपन खात्याने पुढाकार घेतला आहे. जिल्हय़ातील पशु वैद्यकीय दवाखान्यांतून कडीपत्ता, चिंच, बदाम. अशोक, आवळा, फणस, झेंडू, शेवगा, यासह इतर फळे व फुलांची रोपे लावण्यात आली आहेत.
शुक्रवारी पशुपालन व पशुसेवा खात्याचे सहसंचालक डॉ. अशोक कोळा यांच्या हस्ते बेळगाव कार्यालयातील आवारात रोप लागवड करून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. कोळा म्हणाले, प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, औद्योगिकीकरण, वाढती वाहनांची संख्या यांचे थेट परिणाम पर्यावरणावर होत असून जल, वायू, ध्वनी प्रदूषण या आजच्या जगण्यातील प्रमुख समस्या बनल्या आहेत. यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी पशु संगोपन खात्याचे अधिकारी, खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.