ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्घदेव भट्टाचार्य यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी मीरा भट्टाचार्य यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुद्घदेव भट्टाचार्य यांच्यावर सध्या घरातच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तर त्यांच्या पत्नी मीरा भट्टाचार्य यांची तब्येत थोडी बिघडली असल्याने त्यांना बुडलैंड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
बुद्घदेव भट्टाचार्य 2000 ते 2011 या काळात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या टीएमसीने राज्याचा कार्यभार स्वीकारला.
दरम्यान, यापूर्वी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांना कोरोनाने आपले शिकार बनवले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरुप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, महाराष्ट्राचे उपुख्यमंत्री अजित पवार आदींना कोरोनाची लागण झाली होती.