ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल सरकारने लॉक डाऊनचा एक दिवस कमी करत पाचव्यांदा नियमांमध्ये बदल केला आहे. या बदलेल्या नियमानुसार राज्यात आता 28 ऑगस्टला संपूर्ण लॉक डाऊन नसेल.
मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 28 ऑगस्टला होणारे संपूर्ण लॉक डाऊन रद्द करण्यात यावे असा आग्रह अनेक ठिकाणावरून केला जात होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दोन दिवस म्हणजेच 27 आणि 28 ऑगस्ट रोजी लॉक डाऊन असल्याने व्यवहार आणि बँकेच्या कामकाजात अडचणी निर्माण होतील तसेच यानंतर 31 ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण लॉक डाऊन आहे.
सरकारच्या पाहिल्या आदेशानुसार, या तिन्ही दिवशी संपूर्ण लॉक डाऊन होणार होते. मागील आदेशानुसार ऑगस्ट महिन्यात पाच दिवस संपूर्ण लॉक डाऊन होणार होते. ते आता नव्या आदेशानुसार चार दिवसांचे होईल. नवीन आदेशात म्हटले आहे की, या महिन्यात आता 20, 21, 27 आणि 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉक डाऊन असेल. याआधी या महिन्याच्या पाच आणि आठ ऑगस्टला देखील संपूर्ण लॉक डाऊन झाले होते.