म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना वाढता प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांनी गुरुवारी तालुक्मयातील पश्चिम भागातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. मराठीबहूल भाग असलेल्या पश्चिम भागातील हिंडलगा, सुळगा (हिं), तुरमुरी, बाची, कुदेमनी, कल्लेहोळ आदी भागात सकाळच्या सत्रात प्रचार करण्यात आला. यावेळी गावा-गावातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनीही समितीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.
विशेष करून या निवडणुकीत युवा पिढीचा भरघोस पाठिंबा मिळत असून गावा-गावात देखील प्रचारासाठी युवा पिढी पुढे येताना दिसून येत आहे. शिवाय दिवसेंदिवस प्रचाराला प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळच्या सत्रात तालुक्मयाच्या पश्चिम भागातील उचगाव, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते या गावातून प्रचार करण्यात आला.
मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी वसा जपण्यासाठी या प्रचारात म. ए. समितीचे कार्यकर्ते एकत्रित येत आहेत. तसेच समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया कुदेमनीतदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी म. ए. समितीचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.