प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
आतापर्यंत घेण्यात आलेल्या लसीकरणामध्ये एकूण 9 हजार 592 हेल्थ वर्करनी पहिला, तर 6 हजार 677 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 58 प्रंटलाईन वर्करनी पहिला, तर 4 हजार 239 जणांनी दुसरा डोस घेतला. तसेच 60 वर्षांवरील 63 हजार 804 व्यक्तींनी पहिला, तर 21 हजार 804 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षांवरील 51 हजार 231 नागरिकांनी पहिला, तर 6 हजार 194 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. जिल्हय़ाला आजपर्यंत एकूण 1 लाख 81 हजार 390 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 40 हजार 780 लसी या कोविशिल्डच्या, तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. 1 लाख 44 हजार 480 कोविशिल्ड आणि 39 हजार 571 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 84 हजार 51 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्हय़ातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 3 हजार 680 लसी असून त्यापैकी 3 हजार 270 कोविशिल्डच्या, तर 410 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्हय़ात सध्या 1 हजार 920 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 1 हजार 840 लसी आणि कोवॅक्सिनच्या 80 लसी शिल्लक आहेत.