वृत्तसंस्था/ मँचेस्टर
यजमान इंग्लंड आणि पाक यांच्यातील येथे सुरू असलेली पहिली क्रिकेट कसोटी शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी रंगतदार स्थितीत पोहचली आहे. पाककडून इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 277 धावांचे आव्हान मिळाले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी इंग्लंडने दुसऱया डावात 55.1 षटकांत 5 बाद 176 धावा जमविल्या होत्या.
या कसोटीत पाकने पहिल्या डावात 326 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत आटोपला. पाकने पहिल्या डावात इंग्लंडवर 107 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. इंग्लंडच्या पहिल्या डावात पॉपने 8 चौकारांसह 62, बटलरने पाच चौकारांसह 38, ब्रॉडने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 चेंडूत नाबाद 29, आर्चरने 1 चौकारांसह 16, वोक्सने 2 चौकारांसह 19, कर्णधार रूटने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. पाकतर्फे यासीर शहाने 66 धावांत 4 तर मोहम्मद अब्बास आणि शदाब खान यांनी प्रत्येकी 2, शाहीन अफिद्री आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
107 धावांची आघाडी घेतलेल्या पाक संघाला मात्र दुसऱया डावात दमदार फलंदाजी करता आली नाही. त्यांचा दुसरा डाव 46.4 षटकांत 169 धावांत आटोपला. पहिल्या डावात दीडशतक झळकविणारा सलामीचा फलंदाज शान मसूदला दुसऱया डावात खाते उघडता आले नाही. यासीर शहाने 1 षटकार आणि पाच चौकारांसह 33, आसद शफीकने 3 चौकारांसह 29, मोहम्मद रिझवानने 2 चौकारांसह 27, अबीद अलीने 3 चौकारांसह 20, कर्णधार अझहर अलीने 3 चौकारांसह 18, शदाब खानने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 37 धावांत 3, वोक्स आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 2, आर्चर आणि बेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडला निर्णायक विजयासाठी पाककडून 277 धावांचे आव्हान मिळाले.
इंग्लंडने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरूवात केली. मोहम्मद अब्बास आणि यासीर शहा यांना खेळपट्टीची साथ चांगलीच मिळत असल्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण आल्याचे जाणवले. मोहम्मद अब्बासने इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बर्न्सला पायचीत केले. त्याने 1 चौकारांसह 10 जमविल्या. सिबेली आणि कर्णधार रूट यांनी सावध फलंदाजी करत दुसऱया गडय़ासाठी 64 धावांची भागिदारी केली. यासीर शहाने सिबेलीला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. सिबेली बाद झाल्यानंतर कर्णधार रूट अधिकवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. नसीम शहाच्या गोलंदाजीवर बाबर आझमने कर्णधार रूटला टिपले. त्याने 84 चेंडूत 7 चौकारांसह 42 धावा जमविल्या. यासीर शहाने इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का दिला. त्याने स्टोक्सला मोहम्मद रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. स्टोक्सने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. इंग्लंडची यावेळी स्थिती 42 षटकांत 4 बाद 106 अशी होती. इंग्लंडला विजयासाठी आणखी 171 धावांची जरूरी असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत. चहापानापूर्वी इंग्लंडने आणखी एक गडी गमाविला. शाहीन आफ्रिदीने पॉपला शदाब खानकरवी झेलबाद केले त्याने 1 चौकारांसह 7 धावा जमविल्या. चहापानावेळी इंग्लंडने 53 षटकांत 5 बाद 167 धावा जमविल्या होत्या. बटलर आण वोक्स या जोडीने संघाला सावरताना सहाव्या गडय़ासाठी अर्धशतकी भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव सर्वबाद 326, पाक प. डाव सर्वबाद 219 (पॉप 62, बटलर 38, ब्रॉड नाबाद 29, वोक्स 19, आर्चर 16, रूट 14, यासीर शहा 4-66, मोहम्मद अब्बास 2-33, शदाब खान 2-13, शाहीन आफ्रिदी 1-51, नासीम शहा 1-44), पाक दु. डाव- 46.4 षटकांत सर्वबाद 169 (यासीर शहा 33, आसद शफीक 29, मोहम्मद रिझवान 27, अबीद अली 20, अझहर अली 18, शदाब खान 15, ब्रॉड 3-37, वोक्स 2-11, स्टोक्स 2-11, आर्चर 1-27, बेस 1-40).
इंग्लंड दु. डाव- 55.1 षटकांत 5-176 (सिबेली 36, रूट 42, बर्न्स 10, स्टोक्स 9, यासीर शहा 2-39, नसीम शहा 1-24, मोहम्मद अब्बास 1-23, शाहीन आफ्रिदी 1-38)