बेंगळूर : राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात का? परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा का?, याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यात येईल. तसेच राज्यभरात 24 मेपासून बारावी तर 21 जूनपासून दहावीच्या परीक्षा होणार आहेत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी खात्याकडून सर्व तयारी करून परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. चिक्कमंगळूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.राज्यात गेल्यावर्षी कोरोनाच्या छायेत खबरदारी घेत दहावी आणि बारावी परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या होत्या. यंदा 24 मेपासून बारावी आणि 21 जूनपासून दहावीच्या परीक्षा होणार आहेत. पहिली ते नववीपर्यंच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत शिक्षण खाते सरकारच्या अंतिम निर्णयाची वाट पहात आहे, असेही ते म्हणाले.
Previous Articleपाच वर्षात बिबटय़ांची संख्या दुप्पट
Next Article बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.