आठवणी झाल्या ताज्या : घरदारात रमली ती महिला ?लढण्याची जगण्याची उर्मी देणारी आठवण कोरोनामुक्त महिलेने दिली
प्रतिनिधी / सातारा
गतवर्षी सातारा जिह्यात खंडाळा तालुक्यात पहिली कोरोना बाधित महिला आढळून आली होती. त्या महिलेला दुबईवरून येताना कोरोना झाला होता.
तब्बल पंधरा दिवस उपचार घेतल्यानंतर ती महिला कोरोना मुक्त झालेल्या घटनेला तब्बल एक वर्ष झाले. कोरोनाला हरवून परत तिच्या कुटुंबात जाताना तिचे अनोखे स्वागत त्यावेळी करण्यात आले होते.आज ती महिला तिच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये रमली असून कोरोनाला दोन हात करण्यासाठी लढा, त्रिसूत्री पाळा असे आवाहन त्या करत आहेत.
चीनसह जगात कोरोनाची एन्ट्री झाली.भारतात ही तो आला.कसा आहे तो त्यावर उपाय नाही अशी भीती त्यावेळी निर्माण झाली होती.सातारा जिह्यातील प्रशासन तब्बल एक महिना अगोदर बैठका घेत होते. सगळीकडे लॉकडाऊन होता.याच लॉकडाऊनच्या काळात बाहेरून आलेली खंडाळा येथील 60 वर्षं वयाची महिला दुबईस्थित असलेल्या तिच्या पतीला भेटायला गेली होती.परत येताना विमानात तिच्या शेजारी असलेला एक प्रवाशी केवळ शिंकला एवढंच निमित्त झालं. त्या महिलेची तपासणी तेव्हा त्यांना संसर्ग झाल्याचे जाणवले. थकवा जाणवला. त्या वाहन नसल्याने कशातरी गावी पोहचल्या. पण गावात न जाता त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठलं होत तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं होत.तेथे तपासणी केली तेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. रिपोर्ट ऐकून त्यांना धक्का बसला नव्हता. डॉक्टरानी त्यांना आधार दिला.धीर दिला अन त्यांनी ही मनाशी निर्धार केला कोरोनाला हरवण्याचा. तब्बल पंधरा दिवस औषध उपचार, आहार योगा करत होत्या.त्यामुळे सकारात्मक विचारसरणी निर्माण झाली. त्या ब्रया झाल्यावर चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी ही चाचणी केली निगेटिव्ह आल्या.त्यांचा कोरोनामुक्त म्हणून त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यांच्या घरी गेल्यानंतर ही 14 दिवस कोरोनटाइनमध्ये होत्या. आज गतवर्षीच्या आठवणीना उजाळा देत कोरोनाला हरवून आल्याचा आनंद त्यांच्या कुटूंबात त्या साजरा करत आहेत.
वाचनाने त्यांचे एकटेपण घालवले विलीनीकरणात असताना त्यांच्याजवळ आपलं अस कोणी नव्हतं.मात्र, त्यांनी अनेक पुस्तक त्यावेळी जवळ केली.भराभर वाचून काढली अन त्याच्यातुन जगण्याची नवी उमेद त्याना त्यावेळी सापडली.जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी चांगले उपचार केले. जिह्यातील पहिली कोरोनाला हरवून आलेल्या महिलेच्या घटनेला एक वर्ष झाले.