प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी, पहिल्या गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन रिक्षाचालक राजेश गवळी यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बॅरिकेडस् हटाव नेते सुभाष घोलप यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच टिळकवाडीतील रहिवाशांना 19-6-14 पासून गैरसोयींच्या बॅरिकेडस्च्या गुलामगिरीत रहावे लागत आहे.
कर्नाटक पोलीस महासंचालक प्रवीण सुद यांच्या आलेल्या आदेशाप्रमाणे येथील गैरसोयीच्या बॅरिकेड्सची पाहणी करावी व जनतेची बॅरिकेडस्पासून मुक्तता करावी, असे सांगून न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहिल, असे सांगितले.
यावेळी सौंदर्या मणतुर्गी, श्रृती मुजुमदार श्रीकांत नायकोजी, राजेश गवळी, प्रदीप गवळी, शिवाजी गवळी, वासीम पठाण, दीपक गौंडाडकर, शिवराज गवळी, विजय कामकर, नजीर कोतवाल, उदय महागावकर तसेच आसपासचे व्यापारी उपस्थित होते.