अंतराळवीराने साजरा केला 50 वा जन्मदिवस
नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांचा 50 वा जन्मदिन अत्यंत विशेष ठरला आहे. जीवनाची 50 वर्षे पूर्ण होण्याचा आनंद त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आइस्क्रीम पार्टी करून व्यकत केला. स्पेसएक्सच्या ड्रगन कार्गो शिपद्वारे हे आइस्क्रीम अंतराळ स्थानकात पोहोचले होते.
यापूर्वी कुणीच माझ्यासाठी माझ्या जन्मदिनी स्पेस शिप पाठविली नव्हती. एक्सपेडिशन 65 च्या चालक दलाच्या सहकाऱयांसोबत बर्थडे डिनर खरोखरच उत्तम होता. मी जगभरातील मित्र, अंतराळप्रेमींकडून मिळणाऱया शुभेच्छांमुळे अत्यंत आनंदी आहे. मी 50 वर्षांची झाली असली तरीही सध्या एका भाग्यशाली मुलीप्रमाणे मला वाटत असल्याचे मेगन यांनी म्हटले आहे.
स्पेसएक्सने मुंग्या, एवोकाडो, निंबू, आइस्क्रीम तसेच भोजन आणि मानवी आकाराच्या रोबोटिक हातांना रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचविले होते. फाल्कन रॉकेटने नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून उड्डाण केले हेते.