ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच एका परराज्यातील व्यक्तीला जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळाले आहे.
नवीन चौधरी असे जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चौधरी हे आयएएस अधिकारी असून, जम्मू-काश्मीरच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत.
केंद्र सरकारने मागील वर्षी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर परराज्यातील नागरिकाला जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान चौधरी यांना मिळाला. चौधरी हे मुळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी जम्मूमधील बाहू तहसिलदार कार्यालयात डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची छाननी करून बाहूचे तहसीलदार रोहित शर्मा यांनी जम्मू-काश्मीर ग्रँट डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसिजर रूल्स २०२० च्या नियम ५ अंतर्गत चौधरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रदान केले.