अनेकदा छायाचित्रकार स्वतःच्या कॅमेऱयात काही असे दृश्य कैद करतात, ज्याला पाहून त्यांना स्वतःलाच थक्क व्हायला होते. व्हाइल्डलाइफ फोटोग्राफर म्हणजेच वन्यजीव छायाचित्रकार यवेस ऍडम्स यांच्यासोबतही असेच घडले आहे. त्यांनी एका दुर्मीळ पेंग्विनचे छायाचित्र काढले आहे. हा पेंग्विन पिवळय़ा रंगाचा आहे.
लाखात तो एकटाच होता
यापूर्वी मी कधीच पिवळय़ा पेंग्विनविषयी ऐकले नव्हते. त्या ठिकाणी 1,20,000 पक्षी होते आणि त्या सर्वांमध्ये तो एकटाच होता, त्याच्या व्यतिरिक्त सर्वजण सामान्य वाटत होते, हा खरोखरच वेगळा दिसून येत होता असे उद्गार ऍडम्स यांनी काढले आहेत.
छायाचित्रणाची मोहीम
दक्षिण अटलांटिकदरम्यान मागील दोन महिन्यांपासून छायाचित्रणाशी संबंधित एका मोहिमेचे ऍडम्स नेतृत्व करत आहेत. दक्षिण जॉर्जियाच्या जंगली बेटांवर ऍडम्स यांनी या पिवळय़ा पेंग्विनचे छायाचित्र काढले आहे.
कसा होतो पिवळा
ऍम्डस यांच्युनसार हा एक ल्यूकोस्टिक पेंगिवन आहे. याच्या पेशी मेलेनिनची निर्मिती करत नाहीत. याचमुळे याचे काळे पंख पिवळय़ा रंगाचे होतात.